पिंपरी (Pclive7.com):- पुण्यातल्या डॉ. सतीश चव्हाण यांचा अपहरण झालेला मुलगा अखेर सापडला आहे. स्वर्णव (डुग्गु),वय वर्ष 4, असं मुलाच नाव आहे. बालेवाडीमधून त्याचे अपहरण झाले होते. पुणे पोलिसांची मोठी फौज मुलांला शोधत होती, खूप गुप्तता पाळून हा तपास सुरू होता. जवळपास 300 ते साडे तीनशे च्या वर पोलीस कर्मचारी व अधिकारी या मुलांचा शोध घेत होते.
अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आलयं. चतु:शृंगी पोलिसात याबाबत तक्रार होती. कशासाठी अपहरण केलं किंवा हा याच कारण पोलिस शोधत आहेत. गेले आठ दिवस पोलीस सोशल मीडियावर अनेक ठिकाणी फोटो पाठवून तपास सुरू होता. अखेर मुलाला आठ दिवसांनंतर शोधण्यात यश आलं असून कोणी अपहरण केलं, का केलं हे मात्र अजून कळू शकते नाही, त्याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.
नेमकं काय घडलं होतं?
पुण्याच्या बालेवाडी परिसरातून अकरा जानेवारी रोजी चार वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण झाले. त्यानंतर पोलिसांसह कुटुंबीय आणि राजकीय पुढाऱ्यांनी देखील हालचाली केल्या. मात्र चिमुरड्याचा शोध लागला नाही. तब्बल आठ दिवसानंतर आज बुधवारी (दि.19) पुनावळे येथे तो सुखरूप सापडला आहे.