पिंपरी (Pclive7.com):- गेल्या आठवडाभरात भारतीय जनता पार्टीला दुसरा मोठा धक्का बसला आहे. पिंपळे गुरव येथील नगरसेविका चंदा राजू लोखंडे यांनी आज त्यांच्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. लोखंडे यांनी महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे नगरसेवक पदाचा राजीनामा सुपूर्द केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पती माजी नगरसेवक राजू लोखंडे हे उपस्थित होते.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2022/02/IMG-20220215-WA0009-300x300.jpg)
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला गळती सुरु झाली आहे. गेल्या आठवड्यात मोशीचे वसंत बोराटे यांनी भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. आता चिंचवड विधानसभा मतदारसंघातील चंदा लोखंडे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन भाजपला दुसरा धक्का दिला आहे. त्यांनी महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपदही भूषविले आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2020/08/IMG-20220218-WA0020-300x300.jpg)
भाजप नेतृत्वाला कंटाळून त्यांनी आज नगरसेविकपदाचा राजीनामा दिला असल्याचे चंदा लोखंडे यांनी सांगितले. यापूर्वीच त्यांचे पती माजी नगरसेवक राजू लोखंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. लोखंडे हे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. त्यामुळे लोखंडे यांचा राजीनामा आमदार जगताप यांना धक्का असल्याचे बोलले जात आहे.