पिंपरी (Pclive7.com):- प्रतिवर्षाप्रमाणे शिवशंभो सेवा मंडळ तर्फे २६फेब्रुवारी ते ५ मार्च २०२२ महाशिवरात्रीच्या पवित्र कालखंडामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. गेली दोन वर्ष कोरोना महामारी असल्यामुळे अखंड हरीनाम सप्ताह रद्द करण्यात आलेला होता. परंतु या वर्षी अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन मोठ्या उत्साहाने करण्यात आले.
आज सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी ह.भ.प.श्री.मच्छिंद्र महाराज कुंभार यांच्या काल्याच्या किर्तना नंतर महाप्रसादाने सांगता झाली. याप्रसंगी हभप श्री. मच्छिंद्र महाराज कुंभार यांचा मा. विरोधी पक्षनेते नगरसेवक श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याप्रसंगी शनिवार दि.२६ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२२ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहच्या दरम्यान विविध नामवंत महाराजांचे सुश्राव्य किर्तन सायं.7 ते 9 या वेळेत झाले. शनिवार दि.२६ फेब्रुवारी ह.भ.प.सागर महाराज बोराटे सर, रविवार दि.२७ फेब्रुवारी ह.भ.प.गणेश महाराज वारिंगे, सोमवार दि.२८ फेब्रुवारी हभप संतोष महाराज वनवे, मंगळवार दि.१मार्च ह.भ.प.प्रकाश महाराज साठे , बुधवार दि.०२ मार्च ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम , गुरुवार दि.०३ मार्च ह.भ.प संतोष महाराज पायगुडे, शुक्रवार दि.०४ मार्च हभप.समाधान महाराज शर्मा , व शनिवार दि.०५ मार्च काल्याचे कीर्तन सकाळी 10 ते 12 ह.भ.प.मच्छिंद्र महाराज कुंभार इत्यादी नामवंत महाराजांच्या सुश्राव्य किर्तनाचा नागरिकांनी लाभ घेतला.
तसेच काल्याच्या किर्तनाच्या आदल्या दिवशी टाळ मृदंगाच्या व हरिनामाच्या जयघोषात ग्रंथराज ज्ञानेश्वरीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मा.विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक श्री.विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका सौ.शितलताई नाना काटे यांनी पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले.
यावेळी महादेव मंदिरात व मंदिराबाहेर फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषनाई करण्यात आली होती. त्यामुळे मंदिराचे वातावरण भक्तिमय व प्रसन्न वाटत होते. महाशिवरात्रीच्या दिवशी भाविक भक्तांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावलेल्या दिसत होत्या.
यावेळी यावेळी शिवशंभभो मंडळाचे संस्थापक ज्ञानेश्वर हांडे, अध्यक्ष संपत मेटे, उपाध्यक्ष ऋषिकेश कुटे, सेक्रेटरी बाळासाहेब भुंडे, उपसेक्रेटरी शंकर भालेकर, खजिनदार सचिन काटे, कार्याध्यक्ष नंदकुमार काटे, उपकार्याध्यक्ष कृष्णकांत माकणीकर, सदस्य चंद्रकांत मुरकुटे, शेखर काटे, गणेश काटे, सुनील काटे, संभाजी काटे, सुरेश काटे, बाळासाहेब काटे, अनिल काटे, भरत काटे, सुरेश कुंजीर, राजू काटे, नवनाथ काटे, संजय काटे, अशोक काटे, पुजारी ज्ञानेश्वर मुसंडे, तसेच ग्रामस्थ अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.