पिंपरी (Pclive7.com):- तीनसदस्यीय प्रभाग रचनेनुसार मतदार यादी बनविण्याचे काम पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच प्रभाग रचनेला अंतिम मान्यता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रभागाची संख्या निश्चित करण्याचा आणि निवडणुकीची तारीख जाहीर करण्याचा राज्य निवडणूक आयोगाकडे असलेला अधिकार राज्य सरकारने आपल्याकडे घेतला आहे.
राज्य सरकारने राजपत्र नुकतेच प्रसिद्ध केले. त्यामुळे महापालिका निवडणुका ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर पडणार असल्याची चर्चा आहे. राजपत्र प्रसिद्ध करून ११ दिवस उलटले तरी, त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने महापालिकांना त्याबाबत काहीच आदेश दिलेले नाहीत.
तीन सदस्यांनुसार आराखडा तयार
महापालिकेच्या निवडणूक विभागास आयोगाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. महापालिकेने प्रभाग रचनेच्या प्रारुप आराखड्यांवर प्राप्त झालेल्या सूचना आणि हरकतींवर सुनावणीचा अहवाल २ मार्चला निवडणूक आयोगास सादर केला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारच्या राजपत्राबाबत काहीच ओदश मिळाला नसल्याने तीनसदस्यीय प्रभाग रचनेला अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार मतदार यादी बनविण्याचे काम सध्या महापालिकेने हाती घेतले आहे. प्राथमिक स्तरावर यादीचे काम पूर्ण झाले आहे.
Tags: तीन सदस्यीय प्रभाग रचनानिवडणुक आयोगनिवडणुकीची प्रतिक्षापिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकमतदार यादी

























Join Our Whatsapp Group