पुणे (Pclive7.com):- महाराष्ट्राचे लोकदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचे मंदिर गडकोट आवार व धार्मिक विधी जत्रा यात्रा उत्सवांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवस्थान समितीच्या प्रमुख विश्वस्तपदी उद्योजक तुषार भिवाजी सहाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सहाणे मित्रपरिवाराने भंडाच्याची मुक्त उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी करीत निवडीचे स्वागत केले.

२०१८ साली पुणे विभागाचे सहधर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांनी सात विश्वस्तांची निवड केली होती. प्रत्येक विश्वस्त व्यक्तीला प्रमुख विश्वस्तपदी काम करण्याची संधी मिळावी या समन्वयातून ठरल्याप्रमाणे रविवारी (दि.३) मावळते प्रमुख विश्वस्त तथा विश्वस्त पंकज निकुडे-पाटील यांनी सहाणे यांच्याकडे सूत्रे दिली. यावेळी विश्वस्त अॅड. अशोकराव संकपाळ, सॉलिसिटर प्रसाद शिंदे, संदीप जगताप, शिवराज झगडे, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, देवसंस्थान कर्मचारी, अधिकारी व सहाणे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
मूळचे जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील रहिवासी असलेले तुषार सहाणे यांचा पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी औद्योगिक वसाहतीमध्ये व्यवसाय आहे. अनेक सामाजिक संस्थांमध्ये पदाधिकारी असलेले सहाणे म्हणाले की, देवसंस्थानच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या कामाला गती देणार असून, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील गडकोट आवार, पायरीमार्गावरील मंदिरे यांच्या विकासकामे डागडुजी दुरुस्तीची कामे सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.
























Join Our Whatsapp Group