पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडी मधील राष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू राहुल धोत्रे यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. त्यांच्याबरोबर जयसिंग जाधव, करण धोत्रे, समीर जाधव, मंगेश मुंडे, नितीन जाधव, यांनीही प्रवेश केला. यांचा प्रवेश आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, आम आदमी पार्टी डॉक्टर विंग अध्यक्ष डॉ. अमर डोंगरे, आप पिंपरी चिंचवड प्रवक्ते प्रकाश हगवणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2022/09/500x500-PMC-News-Banner-Marathi-01-300x300.jpg)
राहुल धोत्रे हे फुगेवाडीतील स्थानिक रहिवासी आहेत. ते राष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू, बेल्ट रेसलिंग (कुस्ती) चेस बॉक्सर आहेत. त्यांचे फुगेवाडी मध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. त्यांनी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचे काम पाहून प्रेरित होऊन आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टीसाठी मी शहरभर काम करणार असल्याचे त्यांनी त्यावेळी म्हटले. यावेळी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.