पिंपरी (Pclive7.com):- फ्री लान्सिंगसाठी मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लिक केल्याने एका तरुणीला १ लाख ८८ हजारांचा फटका बसला आहे. तरुणीला लिंकद्वारे रजिस्टर करण्यास सांगून तिच्याकडून पैसे घेत फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पुनम हिरामन गीते (वय २३, देहुगाव) हिने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला तिच्या व्हॉट्स-ॲपवर फ्री लान्सिंगसाठी एक लिंक आली होती. त्याच्यावर फिर्यादीने क्लीक केल्यानंतर एका तरुणीचा फोन फिर्यादीला आला. ५०० रुपये नोंदणी फी भरण्यासाठी संबंधित तरुणीने सांगितले. त्यानंतर वेळोवेळी लिंकद्वारे फिर्यादीला पैसे भरण्यास सांगून तब्बल १ लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
























Join Our Whatsapp Group