पिंपरी (Pclive7.com):- प्राधिकरण येथील राजमुद्रा ग्रुप प्रस्तुत, मैत्री महिला व्यासपीठ आणि माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ आयोजित दिवाळी पहाट (सप्तसूर) कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निगडी-प्राधिकरण येथील गजानन महाराज मंदिरात हा कार्यक्रम झाला.

दिवाळी पहाटचे यंदाचे १८ वे वर्ष होते. आनंदी जोशी, मंगेश बोरगांवकर, जुईली जोगळेकर, स्वानंदी टिकेकर, पद्मनाभ गायकवाड, अंजली गायकवाड, यशोमन आपटे यांनी सूरांना साज चढविला. जुन्या आणि नवीन गीतांना रसिकांनी भरभरुन दाद दिली. प्रेक्षकांच्या पसंतीनुसार गाणी सादर करण्यात आली. भक्तिगीताने दिवाळी पहाट कार्यक्रमाची सुरुवात झाली.
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने कार्यक्रमाचे निवेदन केले. कार्यक्रमाचे संयोजक राजू मिसाळ यांनी स्वागत केले.
























Join Our Whatsapp Group