पुणे (Pclive7.com):- पुण्यातील सिंहगडावर जोडप्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गडावरील कल्याण दरवाजाजवळ झाडाला गळफास घेऊन प्रेमी युगलाने आयुष्य संपवले. या घटनेमुळे सिंहगड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगडाच्या कल्याण दरवाज्याजवळ सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हे जोडपे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. आत्महत्या केलेल्या तरुण आणि तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. हवेली पोलिसांकडून सध्या घटनेचा तपास सुरू आहे.