पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका, टीम बेसिक्स व आकुर्डीच्या सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय वॉर्ड क्र.१४ मध्ये दत्तवाडी परिसर येथे स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या अनुषंगाने ‘स्वच्छतापर जनजागृती प्रभातफेरी’ घेण्यात आली.

सदर प्रभातफेरीमध्ये कचरा वर्गीकरण, कचऱ्याचे प्रकार, 3R संकल्पना, कचरा वर्गीकरणाचे महत्व, प्लास्टिक बंदी, याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. माळे सर यांचे तसेच श्री.जाधव सर यांचे विशेष सहकार्य लाभले. या प्रभातफेरीमध्ये विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका व सुमारे ७०० विद्यार्थी तसेच आरोग्य निरिक्षक राजेंद्र गायकवाड, लक्ष्मण साळवे, सहाय्यक आरोग्य निरीक्षक विकास शिंदे, प्रभाग प्रमुख सचिन जवळकर, प्रकल्प सहाय्यक – आकाश बोधक, स्वप्निल शेंडगे, दक्षता परब, पुजा सावंत उपस्थित होते. यावेळी स्थानिक नागरिक, विद्यार्थी यांचे चांगले प्रतिसाद व सहकार्य लाभले.





















Join Our Whatsapp Group