पिंपरी (Pclive7.com):- सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि परिसरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार समारंभ सुप्रसिद्ध अभिनेते व देवमाणूस मालिकेतील प्रमुख कलाकार किरण गायकवाड यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे.

संस्थेचे हे १९ वे वर्ष आहे. पिंपळे निलख येथील मनपा शाळेसमोर, मुख्य बस स्टॉप शेजारी सकाळी दहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप, आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप आदी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती फाउंडेशनचे प्रमुख सचिन साठे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

























Join Our Whatsapp Group