पिंपरी (Pclive7.com):- चिखली परिसराच्या विकासाचे शिल्पकार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते स्व. दत्ताकाका साने यांच्या जयंतीनिमित्त रुबी क्लिनिक व साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने उद्या रविवार (दि.१३ ऑगस्ट) रोजी महाआरोग्य शिबीराचे आयोजित करण्यात आले आहे. चिखली येथील महापालिकेची सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक.९२ येथे हे शिबिर संपन्न होणार असल्याची माहिती युवानेते यश साने यांनी दिली.

ह्या शिबिरामध्ये विविध आजारांच्या तपासणी तसेच ५० टक्के सवलतीच्या दरात हाडांचे ऑपरेशन व X Ray सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच भव्य रक्तदान शिबिर आयोजित येत असून प्रत्येक रक्तदात्यास एक हेल्मेट किंवा एअर बर्ड्स देण्यात येणार आहेत.

तरी या परिसरातील जास्तीजास्त नागरिकांनी ह्या शिबिरातील विविध तपासण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यश साने यांनी केले आहे.
























Join Our Whatsapp Group