पिंपरी (Pclive7.com):- नेहरूनगर मधील विठ्ठलनगर वसाहत येथे एका घराला आग लागली. ही घटना रविवारी (दि.२४) मध्यरात्री घडली. यामध्ये २० वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच घरातील साहित्य जळून खाक झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलनगर वसाहत येथे बिल्डिंग नंबर पाचच्या समोर असलेल्या एका घराला रविवारी मध्यरात्री आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. काही वेळेत आगीने रौद्ररूप धारण केले.
परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्राचा बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. घराच्या आजूबाजूला पार्क केलेल्या २० वाहनांना आगीच्या झळा पोहोचल्या. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती मिळत आहे.
























Join Our Whatsapp Group