निलेश लंके यांचा शरद पवार गटात प्रवेश..
पारनेरचे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत गेले होते. ते अहमदनगर लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र हा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेला आहे. त्यामुळे निलेश लंके हे अजितदादांची साथ सोडून शरद पवार गटात सहभागी झाले.
दुसरीकडे मनसे सोडलेले फायरब्रँड नेते वसंत मोरे हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे वसंत मोरे हे सुद्धा आता शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता होती, पण त्यांनी प्रवेश केला नाही.
पवारांना भेटल्यावर वसंत मोरे नेमकं काय म्हणाले..
मी पक्षप्रवेशासाठी आलेलो नाही. मला सुप्रियाताईंनी आजची वेळ दिली होती, त्यामुळे मी आलो होतो. काँग्रेसच्या मोहन जोशी यांच्याशी चर्चा केली, शिवसेना नेत्यांशी पण केली. पुण्यात एक वेगळा प्रयोग होऊ शकतो. कसब्याची पुनरावृत्ती करायची असेल तर त्याला वसंत मोरे कशाप्रकारे उमेदावर असू शकतो हे सांगायला मी शरद पवारांकडे आलो होतो, असं वसंत मोरे यांनी सांगितलं.
मी शरद पवारांना सांगितला आहे मी लोकसभेसाठी इच्छुक आहे. ते महाविकास आघाडीतील मोठे नेते आहेत ते इतर मोठ्या नेत्यांना देखील समजू सांगू शकतात. पुढील दोन दिवसात मी माझी भूमिका स्पष्ट करेन, असं वसंत मोरे म्हणाले.
























Join Our Whatsapp Group