पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील अँक्सिस बँकेचे ७४ लाख रुपये घेऊन ड्रायव्हर गाडीसह पळून गेला असल्याची खळबळजनक घटना आज दुपारी घडली. रणजित धर्मराज कोरेकर असं फरार ड्रायव्हरचे नाव असून पोलीसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणाबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले की, आज दुपारी १.२० वाजता बिन्स कंपनीची गाडी अँक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी MH-14- CX571 क्रमांकाची गाडी आली होती. त्यात ड्रायव्हरसह चार कर्मचारी होते. एटीएममध्ये पैसे भरले जात असताना ड्रायव्हर रणजित हा गाडीतील ७४ लाख कँशसह पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाकड पोलीस पुढील तपास करित आहेत. याप्रकरणी तपासासाछी ६ पथके पाठवण्यात आली असल्याचे शिंदे म्हणाले.