पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथील हेमू कलानी उद्यानामध्ये शहीद हेमू कलानी यांचा अर्ध पुतळा लवकरच सुशोभिकरण करुन बसविण्यात येणार असल्याची माहिती भाजप नगरसेवक संदिप वाघेरे यांनी दिली. याबाबत वाघेरे यांनी पाठपुरावा सुरू केलायं.
याबाबत संदिप वाघेरे म्हणाले की, २००६ पासून या उद्यानात शहीद हेमू कलानी यांचा अर्ध पुतळा बसविण्याचे काम रखडले होते. मुंबई येथील कलासंचनालय यांचे मान्यता अभावी हा प्रस्ताव प्रलंबित राहिला होता. या पुतळ्याचे काम त्वरित सुरु करण्याची मागणी सिंधी बांधवांकडून वारंवार केली होती. त्यानुसार सातत्याने पाठपुरावा करुन कलासंचनालय मुंबई यांची मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार हेमू कलानी यांच्या पुतळ्यास कलासंचनालय मुंबई यांनी मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार डिझाईन तयार करण्यात आले आहे. लवकरच मुख्य वास्तुशास्ञ मुंबई यांची मान्यता मिळवून कामास सुरुवात केली जाणार असल्याचे वाघेरे म्हणाले.