पिंपरी (Pclive7.com):- काही जागा ठरवण्याबाबत विलंब लागतो, आघाडी असेल किंवा महायुती असेल तर काही जागा निश्चित करण्यामध्ये विलंब लागत असतो. पण लवकरच महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय होईल असं अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये थेरगाव येथील रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल तोपर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटेल अशी मिश्किल टिप्पणी ही अजित पवार यांनी केली. प्रवीण माने हा मूळचा माझाच कार्यकर्ता असल्याचं सांगत माने यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाला अजित पवार यांनी एक प्रकारे दुजोराच दिला. मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीतील सर्वजण घड्याळ धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हावरील उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करतील असंही ते म्हणाले.
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या वृत्तावर बोलताना त्यांचे बरेच दिवस घालमेल सुरू होती आता त्यांना निर्णय घ्यावसं वाटलं असेल असेही ते म्हणाले.
























Join Our Whatsapp Group