पुणे (Pclive7.com):- कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून विशाल अग्रवालला ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु विशाल अग्रवालला पोलीस कोठडीची आवश्कता नाही असं पुणे सत्र न्यायालयाने म्हटले आहे.
अल्पवयीन आरोपीचे वडील व बांधकाम व्यावसायिक असलेले विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल, कोझी पबचे मालक नमन प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन अशोक काटकर, ब्लॅक पबचे मालक संदीप रमेश सांगळे, कर्मचारी नीतेश धनेश शेवानी आणि ब्लॅकच्या बार काउंटरच व्यवस्थापक जयेश सतीश गावकर यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने शुक्रवारी (दि.२४) त्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.