काळेवाडी (Pclive7.com):- काळेवाडी येथील मॅक्सरूफ कॉर्पोरेशन प्रा. लि. या कंपनीने काळेवाडी फाटा, वाकड येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले.
एप्रिल, मे महिन्यामध्ये कडक उन्हाळा व सुट्यांमुळे रक्तदान शिबिरे न झाल्याने सर्वत्र रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तदान शिबिरे घ्यावीत असे आवाहन सर्वच रक्तपेढ्यांनी केले आहे. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मॅक्सरूफ कॉर्पोरेशन प्रा. लि. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर संजीव राय यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडी फाटा वाकड येथे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये कंपनीचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच इतर रक्तदाते मिळून ५१ जणांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले. त्यासाठी मोरया ब्लड बँक चिंचवड यांनी सहकार्य केले. शिबिराचे समन्वयक मणेश म्हस्के यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना सर्व स्टाफने सहकार्य करुन शिबीर यशस्वीरीत्या संपन्न केले.
सर्व रक्तदात्यांना ब्लड बँक तर्फे निलेश गायकवाड यांनी सन्मान पत्र दिले तर मॅक्सरूफ कंपनीतर्फे सर्वांना गुलाब पुष्प व भेटवस्तू देवून प्रोत्साहित करण्यात आले.
Tags: काळेवाडीकाळेवाडीत मॅक्सरूफ कॉर्पोरेशनच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्नमॅक्सरूफ कॉर्पोरेशनरक्तदान शिबीर संपन्न