जेसीबीच्या सहाय्याने पाण्याचा निचरा, नागरिकांना निवाऱ्यासह केली जेवणाची व्यवस्था
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्र.२१ मधील १०० फुटी रस्त्यावर संततधार पावसामुळे पाणी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. सदर ठिकाणी कार्यक्षम नगरसेविका सौ. उषाताई संजोग वाघेरे पाटील यांनी भर पावसात प्रत्यक्ष नागरिकांच्या भेटी घेऊन पाहणी करून जेसीबीच्या साहाय्याने काम करून घेत पाण्याचा निचरा करून दिला.

तसेच पिंपरीमधील संजय गांधी नगर परिरातील घरामंध्ये पावसाचे पाणी शिरल्याने खबरदारी म्हणून त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था कमला नेहरू शाळेमध्ये करण्यात आली.
मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे पिंपरी गावातील स्मशानभूमी संपूर्ण पाण्याखाली गेल्याने सदर ठिकाणी भेट देऊन नागरिकाशी संवाद साधला. सध्याच्या संततधार पावसामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी व विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन नगरसेविका सौ.उषाताई संजोग वाघेरे यांनी केले.






















Join Our Whatsapp Group