पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हातात राहणार याचा सस्पेन्स आणखी वाढलाय. आज भाजपकडून स्थायीच्या ६ सदस्यांची निवड होणार आहे. त्यात शितल शिंदे, विलास मडेगिरे, ममता गायकवाड, राहुल जाधव, नम्रता लोंढे, सागर अांघोळकर यांची निवड झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. निवड झालेल्या सदस्यांमध्ये आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप आणि जुने भाजप या सर्वांचीच निवड करण्यात आली आहे.
सदस्य निवडीला काही मिनिटांचाच कालावधी शिल्लक राहिला असून महासभेत या नावांची अधिकृत घोषणा होणार आहे. नव्या जुन्यांची सांगड घालत सदस्यांची निवड होणार असल्यामुळे अध्यक्ष पदी नेमक्या कोणत्या गटाची वर्णी लागणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.






















Join Our Whatsapp Group