पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपचे ६ आणि राष्ट्रवादीचे दोन अशा ८ सदस्यांची स्थायी समितीत निवड करण्यात आली. नेमक यात कोणाची वर्णी लागणार यावरून गेल्या काही दिवसांपासून बरिच चर्चा सुरू होती.
आज झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. भाजपकडून ६ नावे जाहिर करण्यात आली. त्यात १. शितल शिंदे, २. ममता गायकवाड, ३. सागर आंघोळकर, ४. राहुल जाधव, ५. विलास मडेगिरी, ६. नम्रता लोंढे यांची निवड करण्यात आली. तर राष्ट्रवादीकडून १. गिता मंचरकर, २. प्रज्ञा खानोलकर यांनी नियुक्ती झाली. भाजपच्या ६ सदस्यांची नावे Pclive7 ने पुर्वीच जाहिर केली होती.
महापालिकची तिजोरी असलेल्या स्थायी समितीच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्याचात एक भाग म्हणून सत्ताधारी भाजप कोणत्या ६ सदस्यांना संधी देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरले होते. आता येत्या ७ मार्चला यातील एका सदस्याची अध्यक्षपदी निवड केली जाणार आहे. तुर्तास तरी शितल शिंदे आणि राहुल जाधव यांच्यातच चुरस होणार आहे. आता नेमकी कोण बाजी मारतो हे पहावं लागणार आहे.






















Join Our Whatsapp Group