आकुर्डी (Pclive7.com):- नुकतीच RTE च्या प्रवेशाची सोडत जाहीर झाली असून पिंपरी चिंचवड शहरातील बहुचर्चित क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल मध्ये RTE चे प्रवेश लागल्याचे मेसेज पालकांना आल्यानंतर मान्यता रद्द केलेल्या शाळेत नंबर लागल्यामुळे पालकांचा गोंधळ उडाला असून शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याने या भोंगळ कारभाराचा फटका पालकांना बसत असल्याचा गंभीर आरोप आकुर्डी येथील दिवंगत नगरसेवक जावेद शेख स्मृती प्रतिष्ठान चे इखलास सय्यद आणि तौहिद जावेद शेख यांनी केला आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240624-WA00001-300x300.jpg)
याबाबतचे निवेदन प्रशासन अधिकारी शिक्षण मंडळ याना देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, मोठ्या प्रतीक्षेनंतर दोन दिवसांपूर्वी RTE ची सोडत जाहिर झाली पालकांनी मोठ्या अपेक्षेने आपल्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून RTE चे प्रवेश अर्ज भरले होते. त्यातच मान्यता रद्द झालेल्या व बंद पडलेल्या शाळेत नंबर लागला असल्याने पालक हवालदिल झाले आहेत.
क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल मध्ये प्रवेश मिळाले नंतर काही पालक शाळेची माहिती घेण्यासाठी गेले असता त्या इमारती मध्ये फक्त शाळेचा बोर्ड दिसून आला व इमारतीच्या मालकांना विचारले असता शाळा बंद पडली असल्याचे सांगितले. नंतर पालकांचा मोठा धक्का बसला आहे. काही महिन्यांपूर्वीच सदर शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. या भोंगळ कारभाराला शिक्षण मंडळाचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार असून ज्य पालकांचे मुलाचे प्रवेश संबधीत शाळेत झाले आहेत त्या सर्व पालकांना दुसऱ्या जवळच्या शाळेत प्रवेश देण्यात यावा अन्यथा सर्व पालकांना घेऊन मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिवंगत नगरसेवक जावेद शेख स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला आहे.