उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ‘भगवा प्रहार’; महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे प्रचारासाठी विराट सभा
भोसरी (Pclive7.com):- भारताचा पाया सनातन आहे आणि सनातवर प्रहार हा महाविनाशाला आमंत्रण आहे. ‘बटेथे तब कटेथे.. अब बटेंगे नहीं… एक रहेंगे तो सेफ रहेंगे’. काँग्रेस सत्ताकाळात पाकिस्तान भारतात घुसखोरी आणि आतंकी हल्ले करीत होता. आम्ही संसदेत आवाज उठवत होतो. त्यावेळी पाकिस्तानशी संबंध बिघडतील म्हणून काँग्रेस यामुद्दावर बोलू नका, अशी भूमिका घेत होते. मात्र, आता नवा भारत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात नवा भारत म्हणजे ‘‘हम छेडेंग नहीं लेकीन हमें छेडेंगे तो छोडेगे नहीं’’ असा संदेश जगभरात गेला आहे. हा नवा भारत आहे. घुसखोरी कराल, तर घुसून मारण्याची हिंमत ठेवतो. देशाच्या समस्येचे कारण काँग्रेस आघाडी आहे, तर समस्यांवरील समाधान भाजपा महायुती आहे, असा घणाघात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केला.

भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना- एनसीपी- आरपीआय- मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी भोसरी येथील गावजत्रा मैदानावर रविवारी विराट सभा झाली. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि सभेला सुरूवात झाली.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, गुजरातचे माजी मंत्री प्रदीज जडेजा, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, प्रखर हिंदूत्ववादी डॉ. मिलिंद एकबोटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, मंगला कदम, ज्येष्ठ नेते वसंत लोंढे, हभप दत्तात्रय गायकवाड, राष्ट्रवादीच्या कविता आल्हाट, शिवसेनेचे संभाजी शिरसाट, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे, भाजपाचे शत्रुघ्न काटे, सुजाता पालांडे यांच्यासह महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते आणि हजारो नागरिक उपस्थित होते.
योगी आदित्यनाथ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यभूमिला नमन करतो. महाराष्ट्रात नवीन सरकार बनवण्यासाठी निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात महायुती गठबंधन आहे. गेल्या १० वर्षांत नवा भारत निर्माण होत आहे. ‘सबका साथ सबका विकास’ या भावनेतून देशाची प्रगती सुरू आहे. कुणाचे तुष्टीकरण केले जात नाही. भारताला जोडणाऱ्या शक्ती ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ विचाराने महागठबंधन म्हणून एकत्र आल्या आहेत. दुसऱ्या बाजुला ‘महाअनाडी गठबंधन’ आहे. ज्यांच्याकडे निती, नियत आणि निर्णय घेण्याची क्षमता आणि सामर्थ्य नाही. ‘‘सबका साथ लेकीन परिवारका विकास’’ असा ज्यांचा नारा आहे. त्यांनी भारताच्या विकासाचा विचार केला नाही.
काँग्रेसचा सत्ता लालसेमुळेच अखंड भारताचे विभाजन…
महाराष्ट्राबाबत संपूर्ण देशाला कृतज्ञता…
























Join Our Whatsapp Group