हा शोध कसा सुरू झाला?
गुरुवारी पहाटे २ ते २:३० च्या सुमारास सैफ अली खानच्या राहत्या घराच्या ११ व्या मजल्यावर दरोडेखोर शिरला. यावेळी सैफने आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी या हल्लेखोराचा सामना केला. सैफवर चाकूने सहा वार करण्यात आले याशिवाय अभिनेत्याच्या घरातील मदतनीस सुद्धा यात जखमी झाली होती. रक्तबंबाळ अवस्थेत सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या मते, सैफची प्रकृती स्थिर असून त्याच्या जीवाला कोणताही धोका नाही.
शुक्रवारी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित पहिल्या संशयिताला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला वांद्रे येथील पोलिसांनी चौकशीसाठी आणलं. तथापि, पाच तासांनंतर, त्याला सोडून देण्यात आलं कारण, पोलिसांना आढळले की त्या व्यक्तीचा सैफ प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. शनिवारी पुन्हा एकदा, छत्तीसगडमधील येथे सैफवर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात एका ३१ वर्षीय व्यक्तीला ट्रेनमधून ताब्यात घेण्यात आलं होतं.
मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “दुर्गमध्ये ताब्यात घेतलेला संशयित आरोपी असल्याचं दिसत नाही, परंतु आम्ही पडताळणीसाठी एक पथक (छत्तीसगडला) पाठवलं आहे. मुंबई पोलिस गुन्हेगाराच्या शोधात प्रयत्न करत आहेत.” अखेर मध्यरात्री ठाणे येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. बनावट भारतीय ओळखपत्र असलेला हा हल्लेखोर भारतीय आहे की बांगलादेशी नागरिक आहे याचाही पोलीस तपास करत आहेत.
























Join Our Whatsapp Group