पिंपरीत हॅप्पीनेस स्ट्रीट उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांनी राबविलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याचे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी म्हटले आहे. डब्बू आसवानी आयोजित हॅप्पीनेस स्ट्रीट उपक्रमास आयुक्त शेखर सिंह यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, आपल्या दैनंदिन आयुष्यात खेळ हे महत्वाचे आहे. युवांसोबतच वयस्कर व्यक्तींनी देखील यामध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे, अशाच प्रकारचे उपक्रम लोकप्रतिनिधींनी राबविले पाहिजे असे शेखर सिंह यांनी म्हटलं आहे.

पिंपरीत हॅप्पीनेस स्ट्रीट हा उपक्रम २९ डिसेंबर २०२४ ते २३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दर रविवारी पिंपरी येथील ओपन लॉन येथे राबविले जात आहे. फिट राहा, आनंदी राहा व संपर्कात राहा, असा संदेश देत हा उपक्रम साजरा होत आहे.
यावेळी बोलताना डब्बू आसवानी म्हणाले की, लहान मुलांसह वयस्कर व्यक्तींनी आनंदी राहावे, विविध खेळाचा आनंद घ्यावा, याकरिता या हॅप्पीनेस स्ट्रीट उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमात लहान मुलांसाठी व युवक-युवतींसाठी तसेच वयोवृद्ध व्यक्तीसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमात सर्व वयोगटातील सुमारे ५ हजार नागरिकांचा मोठ्या संखेने सहभाग पाहावयास मिळाला. तसेच हि संख्या प्रत्येक आठवड्यामध्ये वाढतच चालली असून, नागरिक येथे खूप मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत. म्युझिक, डान्स, विविध खेळांच्या स्पर्धा यामध्ये कॅरम, बुद्धिबळ, रनिंग, सायकलिंग, जॅमर्स बोवलिंग, लाईव्ह शो, असे अनेक उपक्रम या हॅप्पीनेस स्ट्रीट अंतर्गत राबविले जात आहेत.

तसेच या ४ थ्या आठवड्यामध्ये एक अजून विशेष ऍक्टिव्हिटीस केली गेली. पिंपरी येथील ज्या कोणी विवाहीत जोडप्याच्या लग्नाला ५० वर्ष पूर्ण झाले आहे. अश्या जोडप्यांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन ठेवले होते व त्यांना स्टेजवर बोलवून एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालून त्यांच्या लग्नाच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांना टोकन ऑफ लव्ह हे प्रेम चिन्ह दिले.
डब्बू आसवानी यांनी राबवलेल्या या उपक्रमाबाबत त्यांना धन्यवाद देण्यासाठी कु.दक्ष संजय मुलचंदानी याने एक रॅप गाणे बनवून ते धन्यवाद स्वरूपात सादर केले. सदर उपक्रमातील लक्की ड्रॉ विजेत्यांचे बक्षीस वितरण पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.

























Join Our Whatsapp Group