पिंपरी (Pclive7.com):- केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीला बँकेचे अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगत एक लिंक पाठवली. त्यावरून अॅप डाउनलोड केले असता व्यक्तीच्या खात्यातून दोन लाख ५५ हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना ६ ऑक्टोबर २०२४ रोजी दिघी येथे घडली असून १६ फेब्रुवारी २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ५४ वर्षीय व्यक्तीने रविवारी (दि.१६) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना फोन करून ते बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्या खात्याची केवायसी बाकी असून केवायसी केली नाही तर खाते बंद होईल, असे आरोपींनी सांगितले.

त्यानंतर केवायसी करण्यासाठी एक लिंक पाठवून बँकेचे अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. त्यावर माहिती भरण्यास सांगून फिर्यादी यांच्या बँक खात्याची माहिती घेत त्यांच्या खात्यातून दोन लाख ५५ हजार रुपये ट्रान्सफर करत फसवणूक केली. फिर्यादी बँकेत गेल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला.

























Join Our Whatsapp Group