पिंपरी (Pclive7.com):- तळवडे औद्योगिक क्षेत्रासह परिसराचा वेगाने विकास होत आहे. तुलनेत वीज पुरवठा यंत्रणेवर ताण येत वीज पुरवठा करणेकामी मर्यादा येत आहेत. त्यामुळे तळवडे एमआयडीसी क्षेत्रातील एमआयडीसीच्या ताब्यातील (कॅनबे चौक) जागा उपलब्ध झाल्याने महावितरणाचे वीज उपकेंद्र उभारणीस वेग आला आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी ऑक्टोबर २०२३ रोजी मागणी केली होती त्याला यश मिळाले आहे.

तळवडे परिसरात औद्योगिक व रहिवासी भागात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे नागरिक व लघुउद्योजक अखंडित व पुरेशा दाबाने वीज पुरवठा होण्याची मागणी पूर्ण करणेकामी कॅनबे चौक, तळवडे एमआयडीसी येथे वीज उपकेंद्र उभारणी करणे काळाची गरज होती. त्यामुळे प्रस्तावित नवीन उपकेंद्राचा प्रकल्प अहवाल महावितरण विभागाने तयार केलेला आहे. कॅनबे चौक तळवडे येथील एमआयडीसीच्या ताब्यातील वाटप न केलेले भूखंड शिल्लक आहेत.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम क्रमांक २२ अ कलम ४० व महाराष्ट्र जमीन (शासकीय जमिनीची विल्हेवाट करणे) नियम १९७१ मधील नियम ५० मधील तसेच महसूल व वनविभाग शासन निर्णय क्रमांक जमीन ३/२०११/प्र.क्र / ५३/अ-१ दिनांक १२/०७/२०११ च्या तरतुदीनुसार कॅनवे चौक तळवडे येथील एमआयडीसीच्या ताब्यातील भूखंडाची जागा महावितरण उपकेंद्र उभारणीसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार कडून महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळास पालकमंत्री अजितदादांनी ३२०० चौरस मीटर (३४४३२ चौरस फूट) जागा वीज उभारणीसाठी उपलब्ध करून देण्याचे ऑक्टोबर २०२३ मध्ये पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. त्यानुसार २४ मार्च २०२५ रोजी MIDC कडून महावितरण कंपनीला ऑफर लेटर प्राप्त झाले आहे.

तळवडे औद्योगिक व रहिवासी भागातील वीज पुरवठा सुधारण्यासाठी महावितरणाच्या वीज उपकेंद्र उभारणीला वेग मिळाल्याने तळवडे परिसरातील विद्युत समस्या नक्कीच सोडवण्यास मदत होईल. माजी नगरसेवक पंकज भालेकर यांच्या मागणीला यश मिळाल्याने आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशामुळे या प्रकल्पाला पुढे चालना मिळाली आहे. कॅनबे चौक, तळवडे एमआयडीसी येथील शासकीय भूखंडावर वीज उपकेंद्र उभारले जाईल, ज्यामुळे परिसरात वीज पुरवठा सुधारेल आणि विकासाच्या वेगात मदत होईल. ३२०० चौरस मीटर जागेची उपलब्धता ही भविष्यातील वीज मागणी पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. तळवडेतील नागरिक आणि लघुउद्योजकांनी या निर्णयासाठी पालकमंत्री अजित पवार आणि पंकज भालेकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.