पिंपरी (Pclive7.com):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंती निमित्त ऑल इंडिया धनगर समाज महासंघ पिंपरी चिंचवड शहर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीतर्फे फटाक्यांची अतिषबाजी करून अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष दिपक भोजने यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला त्यानंतर फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली. गेल्या ३ वर्षापासून अशाच पध्दतीने आतिषबाजी केली जात आहे.
यावेळी युवक आघाडीचे शहर अध्यक्ष महावीर काळे, युवती अध्यक्ष यशोदा नाईकवडे पश्चिम महाराष्ट्र संर्पक प्रमुख सुनिल बनसोडे, शहर कार्यध्यक्ष नवनाथ देवकाते उपाध्यक्ष संजय कवितके, संजय नाईकवडे, गणेश एकल, गोर्वधन कांबळे, युवक उपाध्यक्ष प्रदिप वाघमोडे, विजय महानवर, अॅड. दत्ता शेंडगे, हिराकांत गाडेकर, कौस्तुभ काळे, दत्ता माने, पुरूषोत्तम काळे, निलेश वाघमोडे, दत्ता हजारे, विनायक खामगळ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
३१ रोजी सकाळी महापालिकेच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महापौर नितीन काळजे याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पक्षनेते एकनाथ पवार, उत्सव समितीच्या अध्यक्षा आशाताई शेंडगे, प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसेवक केशव घोळवे, उपअभियंता कार्यकारी अभियंता विजय भोजने, लक्ष्मीकांत कोल्हे उपस्थित होते. त्यानंतर धनगरी गंजीनृत्य, धनगरी ओव्या, योगिता गोडबोले व संदीप ऊबाळे यांच्या गीताचा बहादार कार्यक्रम झाला.