पिंपरी (Pclive7.com):- शिवराज्याभिषेकसाठी पिंपरी चिंचवडमधून छावा संघटनेचे पदाधिकारी दुर्गराज रायगडकडे आज रवाना झाले आहेत.
दरवर्षी किल्ले रायगड येथे ६ जुन रोजी होणाऱ्या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड आणि परिसरातून छावा संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रायगडावर जातात. धानोरी, विश्रांतवाडी, येरवडा वडगावशेरी तसेच पिंपरी चिंचवडमधील कासारवाडी येथील छावा संघटनेचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते छावाप्रमुख धनंजय जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली आज रवाना झाले आहेत. छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातुन छत्रपती शिवरायांचे विचार रयतेपर्यंत विचार पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे किल्ले रायगडावरती यंदा मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार असुन प्लॅस्टिकमुक्त रायगड ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात येणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण सोहळा पार पडणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.