पिंपरी (Pclive7.com):- ५ जुन हा जागतिक पर्यावरण दिन म्हणुन साजरा केला जातो, हा केवळ एक दिन नसुन पर्यवारण संवर्धनाची मोठी मोहीमच या दिवशी राबवली जाते, या दिनाचे अैचित्य साधुन आज रहाटणी पिंपळे सौदागर या प्रभागामध्ये नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका सौ.शितल विठ्ठल (नाना) काटे यांच्या वतीने परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली व पर्यावरण संवर्धनाविषयी जागृती करण्यात आली.
या पर्यावरण जनजागृतीवेळी प्लास्टीकचा वापर टाळावा, प्लास्टीक पिशव्या ऐवजी कापडी पिशव्याचा वापर करावा, असा संदेश देण्यात आला. आपल्या जवळील परिसर स्वच्छ ठेवावा, जास्तीत जास्त सौरऊर्जेचा वापर करून वीजेची बचत करण्यात यावी. पाण्याचा गैरवापर टाळून त्याचा योग्य प्रमाणात वापर करावा, येणाऱ्या पावसासात आपल्या परिसरांत मोकळ्या जागेत झाडे लावून व त्याचे जतन करण्याचा व, आपण येणाऱ्या जाणार्या रस्त्यावर जेथे झाडे नाही तेथे झाडे लावू असा संकल्प यावेळी नाना काटे व उपस्थीत नागरिकांनी आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केला. जर आपण सर्वांनी या प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविल्यास आपण खर्या अर्थाने पर्यावरणाच्या समृद्धीच्या दिशेने वाटचाल करू यात शंका नाही असेही आव्हान नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले. या मोहीमेत आरोग्य विभागाचे अधिकारी सौदायी, श्री व सौ सुर्वे, सौ. संचेती मॅडम, राजु कुटे, शशीकांत धनवटे व आरोग्य विभागाचे कर्मचारी आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group