पिंपरी (Pclive7.com):- चऱ्होली खून प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने एका धक्कादायक कटाचा उलगडा केला आहे. वहिनीशी असलेल्या अनैतिक संबंधातून सख्ख्या भावानेच मोठ्या भावाचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. यातील विशेष बाब म्हणजे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी भावानेच पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्यात मृत भावाची पत्नीही सहभागी असल्याचे स्पष्ट झाले असून, अनैतिक संबंधातून भावाचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

धनू दादा लकडे (३३) यांचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी सोमनाथ दादा लकडे (१९, रा. काळे कॉलनी, आळंदीरोड, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, धनू लकडे यांची पत्नी शीतल (२५) हिला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास प्राईल्स वर्ल्ड सिटी, पठारेमळा, चऱ्होली येथील सिक्युरिटी केबिनच्या समोर धनू लकडे यांचा मृतदेह सापडला होता. त्यांच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार करण्यात आले होते. सुरुवातीला अज्ञात आरोपी विरोधात दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खुनाची फिर्याद आरोपी भाऊ सोमनाथ यानेच दिली होती. अज्ञात व्यक्तीने धनू यांच्या डोक्यावर वार करून खून केल्याचे त्याने फिर्यादीत नमूद केले होते. मात्र, फिर्यादीच्या वर्तनावर पोलिसांना सुरुवातीपासूनच संशय होता. दरम्यान, स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या इतर पथकांनी त्याच्याकडे चौकशी देखील केली होती. मात्र आरोपीने पोलिसांच्या प्रश्नांना अतिशय शांतपणे उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याला सोडून दिले होते.
तपासाच्या सुरुवातीपासून गुंडा विरोधी पथक स्वतंत्रपणे काम करत होते. त्यांना स्थानिक खबऱ्याकडून माहिती मिळाली की, आरोपी सोमनाथ याचे वहिनी शीतल हिच्याशी अनैतिक संबंध आहेत. मृत धनू यांना याबाबत संशय होता. त्यामुळे कुटुंबात तणाव वाढला होता. धनू यांनी आक्षेप घेतल्यामुळे तो त्याची पत्नी आणि भावासाठी अडथळा ठरू लागला होता. त्यामुळे दोघांनी मिळून त्याचा खून केला.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त एस.डी. आवाड, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे-१ विशाल हिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, राजेंद्र पवार, पोलीस उप-निरिक्षक समिर लोंढे, पोलीस उप-निरिक्षक सुनिल भदाने, सहायक पोलीस फौजदार पी.पी. तापकीर, एस.एन. ठोकळ, व्ही.एच. जगदाळे, ए. पी. गायकवाड, पोलीस हवालदार जी.एस. मेदगे (तांत्रिक विश्लेषण), पोलीस हवालदार जी.डी. चव्हाण, एस. डी. चौधरी, व्ही.टी. गंभीरे, एस.पी. बाबा (तांत्रिक विश्लेषण), एन.बी. गेंगजे, व्ही.डी. तेलेवार, दळवी, पोलीस शिपाई व्ही.एन. वेळापुरे, एस.टी. कदम, टी.ई. शेख, आर. के. मोहिते, डी.व्ही.गिरी, एस.पी. घारे सर्व गुंडा विरोधी पथक व पोलीस हवालदार प्रमोद गोंडाबे, प्रदीप पोटे, किरण जाधव खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड व टी.ए.डब्ल्यु विभाग यांनी केली आहे.
























Join Our Whatsapp Group