पिंपरी (Pclive7.com):- महेश महांकाळ यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथून वित्तीय व्यवस्थापन या विषयात पी.एच.डी पदवी संपादन केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय “गुंतवणूक निर्णयावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास – म्युच्युअल फंड विरुद्ध पारंपारिक गुंतवणूकीचे मार्ग”(An Investigation of Factors Affecting Investment Decision – Mutual Fund vs Traditional Investment Avenue for Investors) असा होता.

सध्या ते यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस), पुणे येथे एमबीए विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी व संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.























Join Our Whatsapp Group