
पिंपरी (Pclive7.com):- युवा आमदार अमित गोरखे यांचा वाढदिवस मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. विविध राजकीय पक्षाचे नेते, कलावंत, साहित्यिक कामगार आणि कष्टकरी कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि मांदियाळी उल्लेखनीय होती. साहित्य प्रदर्शन आणि विविध सामाजिक उपक्रम साजरे झाले. सर्वपक्षीय नेत्यांनी गोरखे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला. मैत्र भाव जपला. “वाढदिवसानिमित्त साहित्याचा जागर केलेला पहिलाच आमदार, असे उद्गार राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे पुणे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी यांनी काढल्याने आमदार गोरखे यांच्या कार्याची प्रचिती आली. वाढदिवस सोहळा हा “सेवा, संवेदना आणि समाज बांधिलकीचा उत्सव” ठरला.

राजश्री शाहू क्रीडांगण, शाहूनगर, चिंचवड येथे आमदार अमित गोरखे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला १०,००० हून अधिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहून आमदार गोरखे यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. संपूर्ण मैदानात जनतेचा उत्स्फूर्त सहभाग, जयघोष आणि आनंदोत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले.

असे झाले कार्यक्रम….
वाढदिवस कार्यक्रमाची सुरुवात सामाजिक जाणीव जपत करण्यात आली. दिव्यांग व्यक्तींना सायकलचे वाटप करून समाजातील वंचित घटकांना सहाय्य करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ लाख रुपयांचा धनादेश शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. सामाजिक कार्याच्या या वाटचालीत आमदार गोरखे यांनी विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांना ₹५१,००० आणि पूजनीय श्री गुरुजी न्यास यांनाही ₹५१,००० रुपयांचा धनादेश सुपूर्त करून शिक्षण व संस्कार क्षेत्राला बळकटी दिली. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले तसेच त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वतः आमदार गोरखे यांनी स्वीकारली. तसेच आपल्या लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, पापड उद्योगासोबत टायअप करून शेकडो महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रम या अभिष्टचिंतन सोहळ्यात जाहीर करण्यात आला. तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील प्राधिकरण, निगडी आणि चिंचवड परिसरात स्थानिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने अन्नदान व आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

साहित्य जागर असाही!
संभाजीनगर येथील नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणावर भव्य प्रदर्शन भरवण्यात आले आहे. उद्घाटन मा गिरीषजी आफळे यांच्या हस्ते पार पडले यावेळी ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाचे देवळेकर सर उपस्थित होते. त्यामध्ये विविध सुमारे २० हजारांपेक्षा जास्त पुस्तके उपलब्ध असून हे प्रदर्शन ६ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. या प्रदर्शनात कथा, कादंबरी, काव्यसंग्रह वैचारिक व चिंतनात्मक पुस्तकांचा समावेश आहे. ते खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर साहित्य रसिकांची गर्दी उसळली होती.

शुभेच्छा देण्यासाठी अलोट गर्दी…
या भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याला राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे पुणे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी,हेमंत हरहरे, संदीप जाधव, संघ चालक (पिंपरी-चिंचवड) विनोद बन्सल, मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार उमा खापरे, शंकर शेठ जगताप, उमेश चांदगुडे जेष्ठ उद्योजक, माजी नगरसेविका अनुराधाताई गोरखे, मंगलाताई कदम, प्राधिकरण माजी अध्यक्ष सदाशिव खाडे,माजी नगरसेवक, शितल शिंदे, राजेश पिल्ले, संदीप वाघीरे, तुषार हिंगे, केशव घोळवे, बापू घोलप, उत्तम केंदळे, संजोग वाघिरे, संतोष कलाटे, वैशाली खाड्ये, नामदेव ढाके, महेश कुलकर्णी, मधुकर बच्चे, गणेश लंगोटे, अतुल इनामदार, राजू दुर्गे, राष्ट्रवादीचे नेते भाऊसाहेब भोईर, नाना काटे, योगेश बहल,संघाचे प्रकास मिठभाकरे ,शिवसेना कामगार नेते इरफान सय्यद, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सुलभा उबाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित गव्हाणे, राजू मिसाळ, नगरेसवक अमित गावडे, शैलेश मोरे, प्रमोद कुटे ,योगिता नागरगुजे, कैलास कुटे, प्रकाश बाबर, मिनल विशाल यादव, मोरेश्वर शेडगे, कुणाल लांडगे, नवनाथ जगताप, सुनिल कदम, आरपीआय शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, मनसे पिंपरी विधानसभा प्रमुख दत्त देवतरासे, स्थायी समिती सभापती, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, नगरसेवक, समाजसेवक, शिक्षण संस्था चालकांसह सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व मान्यवर आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले बांधव उपस्थित होते. यातून अमित गोरखे यांचा लोक संग्रह किती अफाट आहे हे दिसून आले.

सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचे वैभव अधिकच खुलले. लोकनेता म्हणून आमदार अमित गोरखे यांच्या कार्यशैलीला आणि सामाजिक भानाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अभिष्टचिंतन सोहळा हा केवळ वाढदिवसाचा कार्यक्रम नसून “सेवा, संवेदना आणि समाज बांधिलकीचा उत्सव” ठरला.

























Join Our Whatsapp Group