
अनिताताई संदीप काटे यांच्या वतीने उपक्रमाचे आयोजन
पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथे महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी कॅन्सर जनजागृती अभियानांतर्गत मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील व समर्थ युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेशजी पांडे यांच्या सहकार्याने हे शिबिर संपन्न होत आहे. प्रभाग क्रमांक २८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ अनिताताई संदीप काटे यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये साधारण ९,५००/- किंमतीची तपासणी मोफत करून देण्यात येणार आहे. हे शिबिर आज बुधवार, दि.२६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायं.५ वाजेपर्यंत चॅलेंजर पब्लिक स्कूल, शिव साई लेन, पिंपळे सौदागर येथे आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरात या तपासण्या करण्यात येणार आहेत :
- स्तनांचा कॅन्सर तपासणी – मॅमोग्राफी
- रक्त तपासणी सीबीसी
- रक्तातील साखर तपासणी (ब्लड शुगर)
- रक्तदाब तपासणी (बीपी)
- डोळ्यांचे तपासणी व मोफत चष्मा वाटप
- सामान्य आरोग्याची मोफत तपासणी
- कोलेस्टेरॉल तपासणी

या उपक्रमाचे आयोजन सौ. अतिनाताई संदीप काटे व सामाजिक कार्यकर्ते श्री. संदीप विठ्ठल काटे यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. तरी प्रभाग क्रमांक 28 रहाटणी- पिंपळे सौदागर परिसरातील सर्व महिलांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
























Join Our Whatsapp Group