पिंपरी (Pclive7.com):- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळवडे प्रभाग क्र. १२ मध्ये मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रचलेला ‘फेक नरेटिव्ह’ भारतीय जनता पक्षाच्या सतर्कतेमुळे सपशेल फोल ठरला आहे. या प्रकरणातील सत्यस्थिती आणि भाजपने घेतलेली ‘सुपर ॲक्टिव्ह’ भूमिका यामुळे विरोधकांचे पितळ उघडे पडले आहे.

प्रभाग क्र.१२ मधील यादी भाग क्र.७ हा निवडणूक आयोगाच्या तांत्रिक चुकीमुळे प्रभाग क्र.१ ला जोडला गेला होता. तळवड्यातील मतदार याद्यांचा हा धक्कादायक घोळाचा प्रकार निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून देणारे पहिले प्रतिनिधी माजी नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर हेच होते. संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात मतदार याद्यांबाबत विसंगती झाली असताना ही एक निवडणूक आयोगाची तांत्रिक त्रुटी आहे हे माहिती असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी याला वेगळे वळण दिले.

त्यांनी ‘कांगावा’ करत असा आरोप केला की, “ही चूक आयोगाची नसून, भारतीय जनता पक्षाने आयोगाच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून माझे मताधिक्य कमी करण्याचा आणि मला पराभूत करण्याचा रचलेला कट आहे.” विशेष म्हणजे, यादी भाग ७ मध्ये त्यांचे स्वतःचे नाव येत असल्याने, त्यांनी मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळवण्यासाठी केविलवाणा आणि भावनिक प्रयत्न केला.

परंतु सत्य स्थिती पहाता भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका अरुणाताई भालेकर यांच्या परिवारातीलही सदस्यांची नावे प्रभाग ११ मध्ये स्थानांतरीत आहेत. तसेच माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे देखील यादी भाग क्र. ७ मध्ये आहेत. तसेच भारतीय जनता पक्षाच्या कोषाध्यक्षा इच्छुक उमेदवार अस्मिता भालेकर यांचे पती अनिल भालेकर व कुटुंबीयांची नावे यादी भाग क्र ७ मध्येच गेली आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षावर केलेले आरोप सपशेल खोटे ठरले आहेत.

राष्ट्रवादीने केवळ त्यांच्या सोयीनुसार यादी भाग ७ (१२६१ मते) चा मुद्दा उचलला, पण सत्य हे आहे की, निवडणूक आयोगाच्या संपूर्ण शहरात झालेल्या या प्रशासकिय अव्यवस्थेमुळे त्रिवेणीनगरमधील यादी भाग क्र. ११४, ११६, ११७, ११८ सह एकूण २२०० हून अधिक मतदार प्रभाग ११ मध्ये स्थानांतरित झाला आहेत.
मतदारांच्या घरोघरी जाऊन जास्तीत जास्त हरकती नोंदवण्याचा उपक्रम माजी नगरसेवक शांताराम बाप्पु भालेकर यांच्या वतिने करण्यात आला. मतदारांना भावनिक सहानुभूती आणि खोट्या आरोपांच्या जाळ्यात न अडकवता, भारतीय जनता पक्षाच्या निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुक प्रक्रियेसाठी नेहमीच सुपर ॲक्टिव्ह राहील, आणि याचे निवेदन फ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांना देऊन हा स्पष्ट संदेश भाजपने कृतीतून दिला आहे.























Join Our Whatsapp Group