पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहराला म्हेत्रे वस्ती येथील वॉटर फिल्टर प्रकल्पातून संपूर्ण पाणी मिळावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक यश दत्ता (काका) साने यांनी महापौर रवी लांडगे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात यश साने यांनी महापौरांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कृष्णानगर म्हेत्रे वस्ती येथील पाणी फिल्टर प्रकल्पातून सध्या सुमारे ३० एमएलडी पाणी पुणे (वाघोली) येथे पाठवले जात आहे. मात्र पिंपरी-चिंचवड शहरात वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती गरज लक्षात घेता शहरातील नागरिकांना पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर म्हेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून होणारा पाणीपुरवठा पिंपरी-चिंचवड शहरासाठीच उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यश साने यांनी निवेदनातून केली आहे. त्यामुळे शहरातील पाणीटंचाईची समस्या कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.



















Join Our Whatsapp Group