राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते संदीप पवार यांचा इशारा
पिंपरी (Pclive7.com):- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’मध्ये वादग्रस्त लिखाण करण्यात आले. विरोधकांनी राजकारणात नैतिकतेच्या मर्यादा पाळाव्या. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर यापुढे खालच्या पातळीवर टीका केल्यास शिवसेनेचा कोणताही मंत्री अथवा संबंधित संपादकाला शहरात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते संदीप पवार यांनी दिला आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत वादग्रस्त लिखाण ‘सामना’मध्ये दि.२७ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रसिद्ध झाले होते. या विरोधात दैनिकाचे संपादक आणि मालक यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार संदीप पवार यांनी रविवारी केली. वाकड पोलीस ठाण्यातील गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पिंजण यांच्याकडे तक्रार करण्यात आली.
याबाबत राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप पवार म्हणाले की, आमचे नेते अजितदादावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधील अग्रलेखातून अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे. शिवसेना दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे हे आयोध्याला राम मंदीर बांधायला निघाले आहेत. त्यावर अजितदादांनी केवळ आधी तुमच्या वडिलाचे म्हणजेच स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधा, मग तुम्ही राम मंदीर बांधा, अशी उपरोधिक टीका केली होती. त्यावर सत्ताधारी म्हणून समर्पक उत्तर देण्याऐवजी ‘सामना’तून खालच्या पातळीवर टीका केली. त्यामुळे दैनिक ‘सामना’तील संपादकासह मालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही सकल मराठा समाजाने मुक मोर्चा काढल्यानंतर दैनिक ‘सामना’मध्ये
दरम्यान, ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराबाबत शहानिशा केली जाईल. तसेच, योग्य चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन वाकड पोलीस ठाण्यातील गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पिंजण यांनी दिले आहे.