पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपाची नवीन कोअर कमिटी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे यांच्या स्वाक्षरीने नुकतीच ही कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे.

या नवीन कोअर कमिटीमध्ये शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, जिल्हा प्रभारी भरत पाटील, सरचिटणीसपदी मोरेश्वर शेडगे, मधुकर बच्चे, विकास डोळस, वैशाली खाडे यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे यांना स्थान देण्यात आले आहे. महापौर रवी लांडगे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, माजी जिल्हाध्यक्ष सदाशिव खाडे यांचा समावेश करण्यात आला आहे.

या नियुक्त्यांमुळे आगामी काळात पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप संघटनेला अधिक बळकटी मिळणार असल्याचे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, पक्षाची विचारधारा आणि विकासाभिमुख धोरणे अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ही कार्यकारिणी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी ते उल्लेखनीय कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.





















Join Our Whatsapp Group