पिंपरी (Pclive7.com):- दरवर्षी प्रमाणे दिवाळीच्या निमित्ताने कै. सदाशिव बहिरवाडे प्रतिष्ठानच्या वतीने पूर्णानगर, शिवतेजनगर परिसरातील आरोग्य विभागाचे पर्यवेक्षक भरत शेंडगे व त्यांचे सफाई कर्मचारी यांना दरवर्षी प्रमाणे मिठाई वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कै. सदाशिव बहिरवाडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, तारामती बहिरवाडे, प्रा.हरिनारायण शेळके, मंगेश पाटील, भरत शेंगडे, डॉ.अतुल केसरकर, सौ. अर्चना तोंडकर, अंजली देव, सारिका रिकामे, अक्षदा देशपांडे, मनीषा माने, डॉ.शीतल केसरकर. सौ. शोभा नलगे उपस्थित होते. सूत्रसंचालन राजाराम सावंत यांनी केले.
नारायण बहिरवाडे म्हणाले,”स्वच्छता कर्मचारी स्वतःचे आरोग्य धोक्यात टाकून, दुसऱ्याचे आरोग्य चांगले राहावे यासाठी रस्त्याची देखभाल तसेच कडेचा कचरा रोज उचलत असतात, त्यांची सुद्धा दिवाळी गोड व्हावी, त्यांच्या या कामाची सामाजिक भावना जपून प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम राबवला जातो”





















Join Our Whatsapp Group