पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी सभापती ममता गायकवाड आणि माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्यावतीने वाकड परिसरात सोसायटी सभासदांसाठी गेली २ वर्षे ‘वाकड प्रीमियर लीग’ नावाने क्रिकेटचे सामने होत आहेत. तिसऱ्या वर्षी देखील हे सामने दि.२८ डिसेंबर पासून सुरू होत असल्याने वाकड-पिंपळे निलखमधील सोसायटी सभासदांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2019/12/IMG-20191207-WA0009-819x1024.jpg)
या वाकड प्रीमियर लीगची सोसायटी सभासदांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता व चर्चा असते. या सामन्यांमध्ये महिला व पुरुषांची स्वतंत्र अशी टीम्स असतात. यामुळे परिसरातील जवळपास सर्व सोसायटीमधील सभासद यामध्ये सहभागी होऊन याचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटतात. वाकड प्रीमियर लीग करीता वाकड परिसरातील सोसायटींनी देखील मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे. यावर्षीचा ‘वाकड प्रीमियर लीग’चा सामना कोण जिंकणार याची उत्सुकता अाहे.
यावेळी बोलताना नंदन इंस्पेरा सोसायटीचे सभासद सचिन लोंढे म्हणाले की, “आमच्या सर्व आयटी वर्गासाठी एक खेळाचे वातावरण तयार करून एक नाविन्यपूर्ण उपक्रम विनायकदादांनी व ममताताईंनी चालू केलेले आहे. त्यामुळे आमच्या सोसायटी यावर्षीचा वाकड प्रीमिअर लीगचा क्रिकेट सामना आपल्याच सोसायटीने जिंकायचा या निर्धाराने आम्ही गेली २ महिने सराव करीत आहोत.”
स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा ममता गायकवाड म्हणाल्या कि “वाकड परिसरात आयटी क्षेत्रातील सभासद मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने व एक खेळाचे वातावरण तयार व्हावे याकरिता आम्ही २ वर्षांपूर्वी हा उपक्रम चालू केलेला होता. यासाठी आम्हाला सर्व सोसायटी मधील सभासदांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पहिल्या वर्षी ५४ टीम्स, दुसऱ्या वर्षी जवळपास ७० टीम्स आलेल्या होत्या. यावरून आपण या वाकड क्रिकेट लीगची उत्सुकता व ओढ समजू शकतो. यावर्षी सुमारे १०० टीम्स सहभागी होतील असा आमचा अंदाज आहे. त्यामुळे याचे नियोजनही मोठ्या प्रमाणात केलेले आहे व क्रिकेट सामन्यांचा सर्व सोसायटीने आनंद घ्यावा असे आवाहन आम्ही करतो”.
आयोजक विनायक गायकवाड म्हणाले की, २८ डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने टीम्सची नोंदणी होत आहे. येत्या गुरूवार दि.१२ डिसेंबर पर्यंत परिसरातील सोसाटींच्या टिम्सने यात नोंदणी करायची आहे. नोंदणीकरिता ९६८९१६९१६९/९८३४१९९१६६ या विनायकदादा गायकवाड युथ फाऊंडेशनच्या क्रमांकावर संपर्क साधावा.