पुणे (Pclive7.com):- नांदेडचे नागरीक लॉकडाऊनमुळे पुणे येथे अडकुन पडलेले होते. सामाजिक कार्यकर्ते सुनिल डोईजड यांच्याशी नागरीकांनी संपर्क केला असता त्यांनी जाण्यासाठी संपुर्ण कागदपत्रे तयार केली. तसेच स्वत: प्रवाशांचा खर्च करुन पुणे येथुन 18 प्रवासी पुणेच्या निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, डी.सी.पी पंकज देशमुख व प्रितम खांदवे यांच्या उपस्थितीत महालक्ष्मी लॉन्स येथून रवाना केले.
लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या घरी जाण्याची ओढ लागली आहे. पण घरी जाण्यासाठी सुध्दा शासनाने अनेक नियम व अटी घातल्या आहेत. कुठे कोणते कागद दयावे, कोणत्या कार्यालयात जाऊन सादर करावे. हे बाहेरील नागरीकांना कळतच नाही. त्यामुळे नांदेडचे रहिवाशी असलेले सद्या पुणे येथे वास्तव्यास असलेले सुनिल डोईजड यांनी या सर्व कागदपत्राची पुर्तता करुन 18 प्रवाशांना गाडीत बसवून हिरवी झेंडी दाखवुन नांदेडकडे रवाना केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, डी.सी.पी पंकज देशमुख यांच्यासह पुतीनजी बालन, पीआय गजानन पवार, पीआय शंकर खटके, प्रितम खांदवे मा. उपसरपंच लोहगाव, विजय गायकवाड सामाजिक कार्यकर्ते, मंगेश पांडे म.न.पा.व सागर खांदवे मनसे पदाधिकारी उपस्थित होते. नांदेडकडे ट्रॅव्हल्स निघताच अनेकांच्या डोळ्यात अश्रुंचा बांध फुटला तर यात अनेक महिला व नागरीक, लहाण मुले, मुली यांचा समावेश आहे. पुणे येथुन नांदेडकडे जाण्यासाठी जे बड्या बड्यांना जमले नाही ते सामाजिक कार्यकर्त्याने करुन दाखविले.

























Join Our Whatsapp Group