पिंपरी (Pclive7.com):- पुणे महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील लाँन्ड्री व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी बाराबलुतेदार महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष विशाल जाधव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपलेला आहे. होम क्वारंटाईन होऊन आज ५० दिवस पुर्ण झाले आहेत. सरकार, सामाजिक कार्यकर्ते व संघटनेने आप आपल्यापरीने शक्य तशी मदत गरजूंना केली आहे. लाँन्ड्री व्यवसायिक हा प्रामाणिकपणे आपले काम करत असतो. तो स्वावलंबी व कर्तृत्ववान असा व्यावसायिक म्हणून ओळखला जातो. त्याला सतत कामात व्यस्त राहिल्या शिवाय तो जगू शकत नाही. तरी आपणही पुणे महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत लाँन्ड्री व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना करण्यात आली आहे. आठवड्यात किमान तीन दिवस दुकाने उघडली जावी अशी मागणी करत, सोशल डिस्टसिंगचे पालन केले जाईल अशी आश्वासनही यावेळी देण्यात आले आहे.

























Join Our Whatsapp Group