पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी यश साने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते याबाबतचे नियुक्ती पत्र देण्यात आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठनेते स्वर्गीय दत्ताकाका साने यांचे चिरंजीव यश साने आहेत. काही महिन्यांपूर्वी दत्ताकाका यांचे दुःखद निधन झाले. त्यावेळी स्वतः शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, पार्थ पवार यांनी सानेे यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. त्यावेळी राष्ट्रवादी पक्ष सदैव साने कुटुंबा सोबत राहील असे आश्वासन देखील दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून स्वर्गीय दत्ता साने यांचे चिरंजीव यश साने यांना पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
या नियुक्तीबाबत बोलताना यश साने म्हणाले की, आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहर विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली त्याबद्दल मी पार्टीचे मनःपूर्वक आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून जी जबाबदारी दिली आहे, ती मी सार्थ ठरवेल. माझे वडील स्व.दत्ताकाका साने यांच्याप्रमाणेच मी पक्षाला उंचीवरून नेण्याचे काम करत राहील.





















Join Our Whatsapp Group