पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील मेडीफिट फाउंडेशन आणि ग्लोबल आय फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “फिटनेस रन” चे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेचे आयोजन ग्लोबल आय फौंडेशन, पिंपळे सौदागर यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. स्पर्धेसाठी सर्वांना सहभागी होता यावे म्हणून 5 km, 10 km आणि 21 km, 35 km, 42 km अशा विभागात घेण्यात आल्या होत्या. कोरोनाचे सर्व नियम पाळून सदर उपक्रम पार पाडण्यात आला.
स्पर्धकांना टी-शर्ट, मेडल, सर्टिफिकेट, स्पर्धेदरम्यान हायड्रेशन तसेच स्पर्धेच्या शेवटी रुचकर नाष्टा देण्यात आला. 5 गटात स्पर्धा घेतल्याने 104 स्पर्धकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला. डॉक्टरांसाठी दर महिन्याला फिटनेससाठी किमान एक उपक्रम घेणे हे मेडीफिट फाऊंडेशनचे ध्येय असल्याची माहिती डॉ.बबन डोळस यांनी दिली.
सदर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डॉ. बबन डोळस, डॉ. धनराज हेळंबे, डॉ. चेतन पटेल, डॉ. प्रशांत पाटील, डॉ.पद्मनाभ केसकर, डॉ. महेश झगडे, विजय सानप यांनी पुढाकार घेतला.

























Join Our Whatsapp Group