पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील क्रोमा मॉलजवळील मोकळ्या जागेत सोमवारी दुपारी बॉम्बसदृश्य वस्तू आढळली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पिंपरी बाजारपेठेजवळच हे ठिकाण आहे. या परिसरात नेहमीच गर्दी असते.
दरम्यान, दुकाने खुले ठेवण्याबाबतचे निर्बंध कमी केल्याने दुकानांमध्येही गर्दी आहे. अशातच ही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून बाँम्ब शोधक व नाशक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. ही वस्तू ब्रिटिशकालीन बाँम्ब असल्याचे बोलले जात आहे.
काही महिन्यांपूर्वी चिंचवडगावातील चापेकर चौकजवळही बॉम्बशेल सापडले होते. याबाबत अधिक तपास केला असता ते बॉम्ब शेल निकामी असल्याचे समोर आले होते. तसेच पूर्वी सैन्याच्या सरावादरम्यान काही ठिकाणी जमिनीत अशाप्रकारचे बॉम्ब शेल गाडले गेल्याचेही बोलले जात होते.
तर अनेकदा भंगार गोळा करताना अशा प्रकारचे निकामी बॉम्बशेल सापडत असतात अशीही माहिती समोर आली होती. दरम्यान, पिंपरीत सापडलेल्या बॉम्ब सदृश्य वास्तुबाबतचा तपास सुरू आहे.
























Join Our Whatsapp Group