पिंपरी (Pclive7.com):- राज्य सरकारच्या आदेशावरून तब्बल वीस महिन्यानंतर राज्यांतील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरु होत आहेत. गुरूवार दि.१६ डिसेंबर रोजी शाळेची घंटानाद होऊन शाळा सुरू झाली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कुदळवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी कुदळवाडी प्रभागाचे नगरसदस्य दिनेश यादव, शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब सगभोर, प्रतिक भासरकर व सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व चॅाकलेट देऊन ढोल ताशांच्या गजरात उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.























Join Our Whatsapp Group