पुणे (Pclive7.com):- पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेलचे मालक जगन्नाथ शेट्टी यांचे निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी सकाळी ८ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
जगन्नाथ शेट्टी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी वैशाली हॉटेल इथे ठेवण्यात येणार आहे. तर सायंकाळी ५ वाजता वैकुंठ स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पुण्यात फर्ग्युसन रोडवर असलेलं वैशाली हॉटेल प्रसिद्ध आहे. श्रीधर शेट्टी यांनी पुण्यात १९४५ ते १९५० या कालावधीत पुण्यात चार हॉटेल सुरु केली होती. त्यात वैशाली हॉटेलचा समावेश होता. श्रीधर शेट्टी यांच्या निधनानंतर त्यांच्या बहिणीचा मुलगा जगन्नाथ शेट्टी यांनी हॉटेलचा व्यवसाय हाती घेतला होता.