पिंपरी (Pclive7.com):- प्राधिकरणातील जागांचे सातबारे संबंधित लोकांच्या नावे होणार आहे. गुंठेवारीतील त्रुटी दूर करा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. गुंठेवारीतील त्रुटी दूर करणे, प्राधिकरणातील घरांचे सातबारे नागरिकांच्या नावे होण्याबाबत अजित पवार यांनी बुधवारी (दि.२६) बैठक घेतली.
या बैठकीला नगरसेविका मायाताई संतोष बारणे, नगरसेवक अजित गव्हाणे, नगरसेवक रवि लांडगे, नगरसेवक पंकज भालेकर, कैलास बारणे, माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, सामाजिक कार्यकर्ते संजय उदावंत, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील जागांचे सातबारे ज्या व्यक्तीने जागा खरेदी केली आहे त्याच्या नावावर करण्यात येतील. त्याबाबतची प्राथमिक प्रक्रिया महापालिका, पीएमआरडीएने करून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावा. गुंठेवारीनुसार अवैध बांधकामे नियमितीकरणासाठी येणाऱ्या अडचणी समजून घ्याव्यात. त्यातील त्रुटी तपासून महापालिका स्तरावर दूर कराव्यात.
नियमितीकरणाची प्रक्रिया आणखी सुलभ करावी. त्रुटी दूर करून, अटी-शर्ती कमी करून प्रस्ताव शासनाकडे पाठवा. त्यावर योग्य निर्णय घेण्यात येईल, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका प्रशासनाला दिला असल्याची माहिती नगरसेविका माया बारणे यांनी दिली.




















Join Our Whatsapp Group