पिंपरी (Pclive7.com):- शाहूनगर येथील गणपती चौक, (अमित कॉर्नर) बीआरटी बस स्टॉप चौक येथे मालवाहतूक ट्रकच्या धडकेने कु. अथर्व अल्हाने, इयत्ता आठवी प्रतिभा स्कूल, राहणार सोहेल रेसिडेन्सी, स्पाईन रोड या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी विद्यार्थ्यांची आई व विद्यार्थी टू व्हीलर वर शाळेत जात असताना मालवाहतूक ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात सुदैवाने आईला जास्त मार लागला नाही. मात्र विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेबाबत बोलताना भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे म्हणाले की, सकाळच्या वेळी या ठिकाणी अतिशय गर्दी असते. चुकीच्या पद्धतीने येथे वाहतूक सुरू असते, कारखान्यांच्या, शाळेच्या बसेस मोठया ट्रक वाहतुकीमुळे हा चौक अतिशय धोकादायक झाला असून या ठिकाणी पूर्ण वेळ वाहतूक पोलीस असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर स्पीड ब्रेकर आणखी जास्त असावेत अशी लेखी मागणी आम्ही करीत आहोत. या ठिकाणी सिग्नल असूनही त्या ठिकाणी कोणीही सिग्नल पाळत नाहीत, हे या अपघाताचे प्रमुख कारण आहे असे प्रत्यक्षदर्शी अपघात पाहिल्यावर मला जाणवले. प्रशासन म्हणून आपण त्यांच्यावर खापर फोडून मोकळे होऊ परंतु गेलेला जीव परत शक्य नाही. त्यामुळे सर्व नागरिक पालकांना माझी विनंती राहील असे अपघात घडू नये म्हणून आपण सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे.

त्या चौकात यापूर्वीही बरेच अपघात झाले आहेत. तरी त्या संदर्भातील तातडीची कारवाई व यापुढे अपघात होऊ नये म्हणून ची काळजी यासाठी आम्ही प्रशासन व पोलिसांना ताबडतोब भेटून याचे गांभीर्य विशद करणार आहोत, परंतु आपल्या प्रभागातील बरेच विद्यार्थी पालक त्या चौकातूनच रोजचा प्रवास करत असतात त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेऊयात असे आवाहन अमित गोरखे यांनी केले आहे.
























Join Our Whatsapp Group